पाच जणांचा मृत्यू 245 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 11) कोरोनाचे 216 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 184 रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 162 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 32 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 21 साई किरण सोसायटी व खारघर सेक्टर 5 साईराम पार्क सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 31 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3405 झाली आहे. कामोठेमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4871 झाली आहे. खारघरमध्ये 53 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4826 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3926 झाली आहे. पनवेलमध्ये 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3645 झाली आहे. तळोजामध्ये 10 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 822 झाली आहे. तसेच महापालिका हद्दीत बरे झालेल्या रुग्णांत पनवेल 24, नवीन पनवेल 26, कळंबोली 14, कामोठे 34, खारघर 64 जणांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 21,496 रुग्ण झाले असून 19,319 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.87 टक्के आहे. 1,684 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 493 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये सहा नवे रुग्ण
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात रविवारी सहा कोरोनाबाधित आढळले आहेत. आजपर्यंत तालुक्यात 1713 रुग्ण आढळले असून 1561 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 63 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये शेलू तीन, दहिवली संजय नगर, कर्जत पाटील आळी, कोंदिवडे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरण तालुक्यात एकास लागण
उरण : उरण तालुक्यात रविवारी एकाला कोरोनाची लागण झाली असून पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळेलेल्या रुग्णांमध्ये कळंबूसरे येथील रुग्णाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नेव्हल स्टेशन करंजा दोन, जासई, नवघर हनुमान मंदिराजवळ, वशेणी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1967 झाली आहे. त्यातील 1740 रुग्ण बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 126 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.