पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि उरण, मुरूड, माणगाव व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा दोन, ग्रामीण तीन) तालुक्यात पाच असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 50,533 आणि मृतांची संख्या 1427 झाली आहे. जिल्ह्यात 45,979 जण कोरोनामुक्त झाल्याने 3127 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper