Breaking News

तांबडी बलात्कार व हत्या प्रकरण ; विशेष पोक्सो न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर

अलिबाग, रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यासाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी (दि. 12) अलिबाग जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली.
रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथे 26 जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी रोहा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अलिबाग येथील विशेष पोक्सो न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपत्र सादर केले आहे. न्यायाधीश शाहिद शेख यांच्या न्यायालयात हा खटला चालणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे आरोपींवर दोषारोप सिद्ध करण्याबाबतची कागदपत्रे 26 ऑक्टोबर रोजी सादर करणार आहेत.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या तांबडी बुद्रुक येथील पाहणी दौर्‍यात पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर आदी उपस्थित होते. या वेळी निकम यांनी घटनास्थळाची पाहणी करीत घडलेल्या संपूर्ण घटनेची पोलीस यंत्रणेकडून माहिती घेतली.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply