पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाग्रस्त 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 338 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण तीन, उरण व खालापूर प्रत्येकी दोन आणि अलिबाग, श्रीवर्धन व पोलादपूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 121, ग्रामीण 33) 154, पेण 40, खालापूर 35, अलिबाग 27, कर्जत 18, उरण व माणगाव प्रत्येकी 17, रोहा 13, महाड नऊ, सुधागड तीन, म्हसळा दोन, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 506 रुग्ण बरे झाले. नव्या रुणांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15201 आणि मृतांची संख्या 422 झाली आहे. आतापर्यंत 11,594 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3185 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper