Breaking News

खारघरमधून 15 वर्षीय मुलीचे अपहरण

वडिलांची पोलीस ठाण्यात धाव

पनवेल ः बातमीदार : खारघर सेक्टर 36मधील स्वप्नपूर्ती सोसायटीच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटजवळ राहणार्‍या निताय प्रफुल्ल सरदार या बांधकाम कामगाराची 15 वर्षीय मुलगी 17 मार्चपासून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, निताय प्रफुल्ल सरदार याने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून माझ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली आहे.  खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर मुलीबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास खारघर पोलीस ठाण्यामध्ये कळवावे, असे आवाहन सदर प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मुंडे यांनी केले आहे.

 निताय प्रफुल्ल सरदार (39) हे बांधकाम साईटवर काम करत असून खारघर सेक्टर 36मधील स्वप्नपूर्ती सोसायटीच्या बाजूला बांधकाम साईटजवळ कुटुंबासह राहतो. 17 मार्च रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लिपिका ही त्याची मुलगी फिरून येते, असे आईला सांगून घराबाहेर पडली, मात्र  बराच वेळ गेल्यानंतरदेखील ती परतली नसल्याने निताय प्रफुल्ल सरदार आणि त्याच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र लिपिका सापडत नसल्याने त्यांनी 18 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तक्रार नोंदविली. कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणासाठी माझ्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार केल्याने खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता,  मुलीचे नाव लिपिका निताय सरदार असे असून ती 15 वर्षांची आहे. मुलीचे केस काळे, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट, पायात काळ्या रंगाची सँडल, त्याच्यावर सोनेरी रंगाची पट्टी असलेली असे तिचे वर्णन आहे.  तिच्या उजव्या पायावर जुन्या जखमेची खूण आहे. सदर मुलीविषयी कोणाला माहिती समजल्यास खारघर पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन तपास अधिकारी मुंडे यांनी केले आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply