Breaking News

सीकेटी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावर्षी हा समारंभ ऑनलाइन साजरा केला गेला. समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुमारी रूचिता लोंढे उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने आणि डॉ. अब्दुल कलाम यांना पुष्पांजली वाहून कार्यक्रमाचा आरंभ झाला. पर्यवेक्षिका नीरजा मॅडम यांनी प्रमुख पाहुण्या रूचिता लोंढे यांची ओळख करून दिली.

श्रावणी थळे या विद्यार्थीनीने श्लोक तर मोनालिसा सामंता या विद्यार्थी ने सुरेल स्वागत गीत सादर केले. मार्वज सोनावले या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल रूचिता घोलप यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध पुस्तकांचा योग्य वापर करत आणि आधुनिक काळात ई-बुक्स चा आधार घेत वाचनाचा छंद जोपासा हा संदेश मुलांना दिला. तसेच विद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध विषयांच्या पुस्तकांची माहितीही दिली. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना रूचिता लोंढे यांनी अब्दुल कलाम यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उभा केला.

मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे जीवनातील महत्व आणि वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या ग्रंथालयाचा दिवसेंदिवस विकास होण्यामागे शाळेचे चेअरमन श्री रामशेठ ठाकूर आणि कार्यकारिणी सदस्य यांचा मोलाचा वाटा आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.

यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश ही लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा निकाल घोषित करून मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

आयुष राजेंद्र पांडा (5वी क), अनुष्का शिवणकर (5वी ब) साहिल अंभुले (5वी अ), कनिष्का हनुमान म्हात्रे (6वी ब), सोहम सुधीर इंदुलकर (6वी क), आर्या गंगाराम सुर्वे (6वी क), दिव्यता देविदास पाटील (7 वी अ), जान्हवी सुनिल हिरे (7वी क), पुजा मिलींद नामे (7 वी अ), देवर्श संतोष पाटील (8वी ब) मार्वज मायप्पा सोनावले (8 वी ब), शार्दूल सुहास तेलगे (8वी अ), समृध्दी प्रकाश पुरोहित (9वी क), श्रावणी दिपक नारकर (9वीक), कृतिका अजित शेलार (9वी ब), साशा (10वी क), प्राजंल रमाकांत त्रिपाठी (10 वी अ), ॠषिका (10वी अ).

सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया ताम्हनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संगणक शिक्षिका शितल कुलकर्णी आणि कविता घाडगे यांनी मेहनतीने तयार केलेल्या पॉवर पॉइर्ंट प्रेझेंटेशनमुळे कार्यक्रमाची रंजकता वाढली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply