Breaking News

नेचर फ्रेन्ड सोसायटीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : बातमीदार

पर्यावरण क्षेत्रात गेली चार वर्ष अविरतपणे काम करत असताना संस्थेचे स्वतंत्र असे जनसंपर्क कार्यालय आणि पर्यावरण व वन्यप्राणी या विषयांचे पुस्तक संग्रालय/वाचनालय असावे, अशी इच्छा बाळगून रविवारी (दि. 11) पळस्पे – ब्राह्मण आळी या ठिकाणी संस्थेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक वनसंरक्षक(प्रादेशिक), पनवेल ज्ञानेश्वर सोनावणे आणि मानद वन्यजीव रक्षक उल्हास ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या वेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष – संतोष उदरे, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सचिव सुशांत वेदक, सदस्य अमित मोरे, प्रसाद शहा, लोकेश फडके, प्रमोद पाटील, संदेश पवार, प्रतिक शेंद्रे, योगेश कारंडे, सौरभ चौधरी, विघ्नेश पाटील, दीपक उदरे, मिथुन नाईक, संदीप भगत, आर्यन उदरे, केवल गायकवाड, निलेश भोपी, ममिता उदरे, आरती जयस्वाल आणि इतर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply