Breaking News

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून, शुक्रवारी (दि. 16) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 310 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 131 व ग्रामीण 21) तालुक्यातील 152, उरण 19, अलिबाग 15, पेण 11, खालापूर 10, रोहा आठ, माणगाव सहा, कर्जत तीन, महाड व पोलादपूर प्रत्येकी दोन आणि श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन, कर्जत दोन आणि खालापूर व पेण तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 51,645 आणि मृतांची संख्या 1462 झाली आहे. जिल्ह्यात 47638 जण कोरोनामुक्त झाल्याने 2545 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply