Saturday , June 3 2023
Breaking News

पवारांना दिल्लीत घर शोधावे लागेल ना. चंद्रकात पाटील यांची टीका

पंढरपूर : प्रतिनिधी

शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, पण याच चार जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ना. पाटील बोलत होते.

 या मेळाव्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार यांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघांमध्ये आहे. यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल. त्यामुळे शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल, असे ना. चंद्रकांत पाटील म्हणाले.

– मला निवडणुकीत जिंकून द्या. आपण सर्व दुष्काळी भागातील पाण्यासाठी लढणारी लोकं आहोत.

-रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माढा मतदारसंघातील युतीचे उमेदवार

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply