Breaking News

रायगडमधील नाते गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड; आमदार डावखरेंचे प्रयत्न

अलिबाग : रामप्रहर वृत्त

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील नाते गावाची निवड झाली आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून एकमेव नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेचा समावेश आहे. त्यानुसार राज्यांच्या पथनिर्देशित संस्थेमार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी नवीन ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाची प्रायोगिक तत्वावर तुलना केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून सध्या उर्जेवर आधारित नवीन परिकल्पना साकारल्या जात असून, त्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळत आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी रायगड जिल्ह्यातील नाते गावाची आदर्श ग्राम करण्यासाठी निवड केली आहे. या निर्णयामुळे गावातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे, ग्राम सचिवालये आणि इतर शासकीय कार्यालये सोलार केली जाणार आहेत. यापूर्वी नाते गावाला जोडणार्‍या पुलाच्या कामासाठी निरंजन डावखरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply