Breaking News

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा ‘चौकार’ रोमहर्षक लढतीत पाकिस्तानवर मात

दुबई : वृत्तसंस्था

ग्लेन मॅक्सवेलची झंझावाती खेळी व गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहा धावांनी पराभूत केले. सलामीवीर अबिद अली व यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी दमदार शतके झळकावूनदेखील पाकिस्तानच्या पदरी निराशा आली.

यासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0ने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिलेले 278 धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 271 धावांपर्यंतच मजल मारता आली. अली (112) व रिझवान (104) यांनी तिसर्‍या गड्यासाठी 144 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानला पहिल्या विजयाच्या आशा दाखवल्या, मात्र अ‍ॅडम झम्पा व मार्कस स्टोयनिसने अनुक्रमे अली व रिझवानला बाद करीत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.

तत्पूर्वी ग्लेन मॅक्सवेलने 82 चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांसह झुंजार 98 धावांची खेळी साकारली. त्याला उस्मान ख्वाजा (62) व अ‍ॅलेक्स करी (55) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत आठ फलंदाजांच्या मोबदल्यात 277 धावांपर्यंत मजल मारता आली. मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply