Breaking News

वरसोलीत ‘गेल इंडिया‘ची स्वच्छता मोहीम; प्रिझम संस्थेचे पथनाट्य

अलिबाग : रामप्रहर वृत्त

स्वच्छता पंधरवडा निमित्ताने उसर येथील गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने वरसोली समुद्र किनार्‍यावर  श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी अलिबाग समुद्र किनार्‍यावर मेरा भारत, स्वच्छ भारत या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्वच्छतेविषयी तसेच प्लास्टिक बंदी, कोविड लसीकरण यांसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.

गेल इंडिया कंपनीचे मुख्य महाप्रबंधक व प्रभारी अधिकारी अनुप गुप्ता, महाप्रबंधक वीरेंद्र कुमार, कासिवेलराजन, जितिन सक्सेना, उपमहाप्रबंधक अतुल दलाल, एलविना आईजक, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टमधील कामगार या वेळी उपस्थित होते. या पथनाट्यात विनोद नाईक, विजय शिंदे, सुचित जावरे, प्रसाद अमृते, श्रेया पाटील, मानसी पाटील, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील आदी कलाकार सहभागी झाले होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply