पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली.
प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने प्रभागातील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांचा दर्जा कायम रहावा व याचा फायदा प्रभागातील नागरिकांसह पनवेलकरांना व्हावा या उद्देशाने प्रभागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामांची पाहणी त्यांनी केली. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी कंत्राटदाराला सुचना सुद्धा केल्या.