Breaking News

कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या विकृताला अटक; नेरूळमधील घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्‍या एका विकृताला नेरुळ रेल्वेस्थानक कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई परिसरातील गॅलरीया मॉल भागात एका कुत्र्याचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीलाही रविवारी पोलिसांनी अटक केली.

आठवड्याभरापूर्वी नेरुळ पश्चिमेला स्टेशनजवळ एका व्यक्ती कुत्र्याचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ‘हा व्हिडीओ पीएफए मुंबई युनिट-2ला मिळाला होता’ अशी माहिती पीएफए कार्यकर्ते विजय रंगारे यांनी दिली. मी आणि माझा सहकारी आदित्य पाटील घटनास्थळी गेलो व मुक्या प्राण्यावर क्रूर पद्धतीने अत्याचार करणार्‍याचा शोध सुरु केला. आम्ही त्या संशियाताला शोधून काढले. ते दैनंदिन मजुरीवर काम करायचा व रात्री स्टेशन परिसरात झोपायचा, असेही रंगारे यांनी सांगितले.

आम्ही आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी गेलो, त्या वेळी तो तिथे सापडला नाही, पण रविवारी दुपारी मला स्थानिक रहिवाशाचा फोन आला. त्याने संशयित त्या भागात असल्याचे सांगितले. त्यानंतर आमची पीएफएची टीम आणि पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले व आरोपीला अटक केली, असे रंगारे म्हणाले. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply