Wednesday , February 8 2023
Breaking News

कुमार, कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

कोलकाता : वृत्तसंस्था

येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 45व्या कुमार, कमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. मुलांच्या क गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडचा 58-16 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. मध्यांतराला 33-07 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने नंतर थोडा सावध खेळ करीत हा विजय साकारला. सौरभ पाटील, शुभम शेळके, पंकज मोहिते यांच्या धारदार चढाया त्याला कोपरारक्षक असलम इनामदार व मधरक्षक वैभव गर्जे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे सहज शक्य झाले. महाराष्ट्रसह या गटात झारखंड, हिमाचल प्रदेश हे दोन संघ या क गटात आहेत. महाराष्ट्राच्या मुलींचा ड गटात समावेश असून केरळ, ओडिशा हे दोन संघ त्यांच्या गटात आहेत. महाराष्ट्राच्या मुलींनी केरळचा 39-15असा पराभव करीत आगेकूच केली. मध्यांतराला 17-06 अशी आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने उत्तरार्धात आपल्या खेळाची गती वाढवित हा विजय साजरा केला. प्रतीक्षा तांडेल, सोनाली हेळवी यांच्या दमदार चढाया आणि साक्षी रहाटे, काजल खैरे, तेजा सपकाळ यांचा भक्कम बचाव या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. आता महाराष्ट्राचा साखळीतील एक सामना ओडिशाबरोबर शिल्लक आहे; तर मुलांचा साखळीतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेशबरोबर होणार आहे. मुलांच्या विभागात 32 संघांनी; तर मुलींच्या विभागात 27 संघांनी सहभाग घेतला आहे. या दोन्ही गटातील सहभागी संघांची प्रत्येकी आठ गटांत विभागणी केली असून, सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविले जातील.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply