Breaking News

राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत सोलापूर संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील मांडवखार येथे विद्युत क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत सोलापूर संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेता पुणे संघ ठरला. तृतीय क्रमांक बीपीटी मुंबई, चतुर्थ क्रमांक टेंबुर्डे यांनी प्राप्त केला. त्यांच्यासह 1 ते 8 क्रमांकापर्यंत विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले.

स्व. श्रीकांत मोकल यांच्या स्मरणार्थ 59वी खुली राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे को. चेअरमन चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या रायगड जिल्ह्यासह राज्यातील नामवंत 32 संघांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू अमिर काजी (कोल्हापूर), उत्कृष्ट नेटमन रोहित वाघमारे (टेंबुर्डे) व नेहाल पाटील आदी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेेवेळी शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव, तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply