पनवेल : रामप्रहर वृत्त
पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाईपलाईनची गळती होते आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी या ठिकाणाची अधिकार्यांसह गुरुवारी (दि. 29) पाहणी केली. व महाराष्ट्र प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना पाईप लाईन दुरुस्ती करुन गळती थांबविण्या संदर्भात निवेदन दिले.
पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान रोड लगतच्या मुंबई-पुणे दुतगती मार्गाच्या खालील पाण्याची पाईपलाईन फुटून सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे दररोज लाखो रूपयाचे पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाईपलाईन नजिकच्या रिक्षा थांवाचा रिक्षा चालक व प्रवाशी यांना दैनंदिन त्रास सहन करावा लागतो, याबाबत नागरीकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी अधिकार्यांसह या ठिकाणाची पाहणी केली.
पाहणी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जिवण प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना या ठिकाणाची तात्काल पहाणी करून पाईप लाईनची दुरुस्ती करून गळती थांबविण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी दिले. या वेळी अभियंता पांढरपट्टे, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंदे पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक रिक्षाचालक उपस्थित होते.