Breaking News

विदेशी दारूची वाहतूक; रेवदंड्यात दोघे जेरबंद

रेवदंडा : प्रतिनिधी

विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन जणांना रेवदंडा पोलिसांनी बागमळा येथे सापळा अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूसह ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. रेवदंडा-अलिबाग रस्त्यावरून विदेशी दारूची ओमनी कारमधून वाहतूक होत असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हवालदार पवार, शिपाई वाघमारे, राकेश मेहत्तर यांनी बुधवारी (दि. 29) बागमळा येथे सापळा रचला.  त्या वेळी बागमळा येथून जात असलेल्या एमएच 43-एफ 7873 क्रमांकाच्या ओमनी कारला थांबवून तपासणी केली असता, त्यात एक लाख 76 हजार 578 रकमेची विदेशी दारू आढळली. पोलिसांनी मिलिंद विठोबा जाधव (वय 33, रा. अलिबाग) आणि सौरभ सत्यजीत शिंदे (रा. अलिबाग) यांना ताब्यात घेऊन बेकायदेशीर व विनापरवाना दारू हस्तगत केली. त्याचप्रमाणे विदेशी दारूसह ओमनी कार जप्त केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65 इ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply