Breaking News

उरणचे सामाजिक कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने कायम आहे. त्याअंतर्गत उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक पक्षाचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. त्या अंतर्गत उरणमधील रोशन लपाशे, रवींद्र चव्हाण, सागर चव्हाण, पंकज राठोड, प्रदीप गायकवाड, रोशन पोल, कृष्णा राठोड, सचिन गुडे, अरविंद राठोड, सकुर शेख, आकाश नरले, भावेश सगर, उमेश चव्हाण, मच्छिंद्र राठोड, ज्ञानेश्वर राठोड, काशिनाथ राठोड, गणेश गुडे, दिलीप पवार या सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष निर्गुन कवळे, उरण तालुका अध्यक्ष विकी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply