Breaking News

करंजाडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद ; आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे करंजाडे नोडमध्ये श्री शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिबिराला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, ज्येष्ठ नेते तानाजी शेलार, श्री शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मंगेश शेलार, विशाल पाटील, दिनेश शेलार, मनीष कटेकर, सत्यजित पाटील, सुरज शेलार आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply