Breaking News

वरंध घाटात दरोडेखोरांची टोळी जेरबंद

महाड : प्रतिनिधी : महाड-महाप्रळ पंढरपूर मार्गावर असलेल्या वरंध घाटात  भोर पोलिसांनी या घाटात सापळा रचून आणखी एका टोळीला अटक केली आहे. भोर पोलिसांनी आंबेघर गावाच्या हद्दीत ही कारवाई केली. यामध्ये एक फरारी झाला आहे, मात्र चौघे जण ताब्यात घेतले आहेत. यांच्याकडे कोयता, मिरचीपूड, एअरगन, मोबाईल, एक दुचाकी आणि कार सापडली आहे.

अटक केलेल्यांमध्ये सागर बंडू यादव, अक्षय यादव (रा. आंबेघर), संदीप हिरगुडे (31, रा. हर्णस), विक्रम शिंदे (19, पिंपळे गुरव), दीपिका शिलीमकर (24, धनकवडी) यांचा समावेश आहे. एक जण मात्र पोलिसांना पाहताच फरारी झाला आहे.वाघजाई ते भोरपर्यंत असलेला मार्ग हा रात्रीच्या वेळेस घनदाट जंगलांचा, निर्मनुष्य आणि रस्त्यालगत तुरळक वस्ती असलेला आहे. याचा फायदा हे चोर घेत असून, पर्यटकांच्या गाड्या आणि वाहतुकीचे ट्रक-टेम्पो लुटण्याचे काम केले जाते. आता त्याला आळा बसणार आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply