पनवेल : रामप्रहर वृत्त
निवृत्तीनंतरही समाजात भरीव योगदान देणार्या शिक्षकांचा गौरव मंगळवारी (दि. 3) ’शिक्षकरत्न’ पुरस्कार देऊन साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकदिनाचे औचित्यसाधून करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच समूह संस्थापक वैभव दिलीप धनावडे यांनी केली.
महाराष्ट्रातील विविध भागांतील शिक्षकांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. या वेळी पनवेल येथील प्रा. फातिमा मुजावर, महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे यांना पुरस्कार कोविडच्या नियमांमुळे शासकीय नियमांचे पालन करत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत प्रा. मुजावर यांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक, गजलकार ए. के. शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी समूह सदस्य, लेखक, पत्रकार संदीप बोडके
उपस्थित होते.