पनवेल : वार्ताहर
कळंबोली वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवळच असलेला स्मृतीवन गार्डनमध्ये गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. 31 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. ओळखपत्र आणि पाकिटातील डायरी वरून मृतांची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. दरम्यान कळंबोली पोलिसांनी मारेकर्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच या खुनाचा छडा लागेल आता विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी कळंबोली सेक्टर 2 ई. सिडकोच्या स्मृतीवन गार्डन येथे अनोळखी मयत व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लागली कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, अंमलदार व गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित अनोळखी मृतदेहाची पाहणी केली. त्या ठिकाणी ओळखपत्र व पॉकेट मधील डायरी आढळून आली. त्यावरून मृताच्या नातेवाइकांचा शोध देण्यात आला. त्यांना त्वरित या ठिकाणी बोलून घेण्यात आले. संबंधितांना मृतदेहाची ओळख पटली. त्यानुसार ता मयाताचे नाव नागनाथ कल्लप्पा माले (31, रा. सध्या रा. चाकण, पुणे मुळ राहणार हुइचिकेरा, ता.हुमनाबाद, जि.बिदर, कर्नाटक) असा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत यांनी भेट दिले. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह सह पोलीस आयुक्त डॉ जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, पुढील तपास करीत आहेत.