Breaking News

संघटनेसाठी काम करणे महत्त्वाचे

भाजपच्या उमाताई खापरे यांचे प्रतिपादन; दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक

माणगाव : प्रतिनिधी

पद हे शोभेसाठी घेवू नये तर संघटनेचे पद घेतले तर प्रत्येकाने संघटनेसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी माणगाव येथे मार्गदर्शन करताना सांगितले.

दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप व दक्षिण रायगड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या नवदुर्गांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी (दि. 5) महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जीचकर, ज्येष्ठ नेते संजय कोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  भाजपच्या  महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी उपस्थित महिलांना मौलिक असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जीचकर, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा हेमा मानकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, सोशल मीडियाच्या श्वेता मॅडम, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षा प्राजक्ता शुक्ला, जिल्हा सरचिटणीस मंजुषा कुद्रमोती, अ‍ॅड. पल्लवी तुळफुळे, श्रद्धा घाग, म्हाशिलकर, माणगाव तालुका महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्यासह महिला मोर्चा कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

या वेळी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जीचकर, उज्वला मराठे, सोशल मीडियाच्या संयोजक श्वेता मॅडम आदींनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर यांनी प्रास्ताविक केले. माणगाव बामणोली रोड मार्गावरील खरे मंगल कार्यालय हॉलमध्ये कार्यक्रम झाला असून नियोजन चांगल्याप्रकारे केल्याने उमाताई खापरे यांनी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा हेमा मानकर तसेच माणगाव तालुका महिला मोर्चा कार्यकारिणीचे कौतुक केले.

महिला बालकल्याणमध्ये केंद्रातील योजना भरपूर आहेत त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. समाजातील महिलांची आपल्याला पद भेटल्यावर जबाबदारी वाढत असते. आपण लोकांसाठी काम केले तर लोक आपल्यासाठी काम करतात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी भाजपच्या महिलांनी रणरागिणीसारखे काम करायला पाहिजे.

-उमाताई खापरे

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply