Breaking News

रायगडात 142 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 128 जण कोरोनामुक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 21) तालुक्यातील 114), खालापूर नऊ, कर्जत सात, अलिबाग तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन आणि मुरूड, सुधागड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गुरुवारी एकाही मयत रुग्णाची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,625 आणि मृतांची संख्या 1564 झाली आहे. आतापर्यंत 51,789 जण कोरोनामुक्त झाल्याने 1272 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply