Breaking News

खोपटे-बांधपाडा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भूमीपूजन

उरण : वार्ताहर

ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीत पंचायत उपसभापती शुभांगी पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जण सुविधेसाठी विशेष अनुदानाने सन 2019-2020 अंतर्गत निधीमधून स्मशानभूमी बांधकाम करणे हे काम मंजूर करण्यात आले होते व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या स्मशानभूमीचे शेड हा काही महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जमीनदोस्त झाले होते व त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी बांधपाडा ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा ठाकूर, खोपटा गाव अध्यक्ष विश्वनाथ पाटील, उद्योगपती प्रदीप ठाकूर, देवेंद्र पाटील, ग्राम.सदस्य अच्युत ठाकूर, देवानंद पाटील, संदेश म्हात्रे,मीनाक्षी म्हात्रे,  बांध पाडा अध्यक्ष कृष्णा ठाकूर, देऊळ पाडा अध्यक्ष गिरिधर घरत, पाणी कमिटी सभापती राजेंद्र म्हात्रे, हेमंत ठाकूर, विश्वजित घरत, विश्वास पाटील, सुगंधा कोळी, कलावती घरत, परेश ठाकूर, परेश पाटील, सूरज ठाकूर, योगेश म्हात्रे, रुपेश ठाकूर, प्रीतम ठाकूर,विष्णु पाटील, पंकज ठाकूर, समीर ठाकूर, प्रशांत ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply