Breaking News

कर्नाळा अभयारण्यात आज पक्षी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र शासनाने 5 ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारे पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. या निमित्ताने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून सोमवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पक्षी संमेलनास वनविभाग अलिबाग, सामाजिक वनीकरण पनवेल, पोलीस निरीक्षक पनवेल ग्रामीणमधील कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहून ग्रीनवर्क ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने महाराष्ट्रातील पक्ष्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संमेलनात पक्षी निरीक्षण, पक्ष्यांची ओळख आदींची माहिती दिली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply