Breaking News

उरणमध्ये मोठ्या झाडांची पडझड

उरण : वार्ताहर

निसर्ग चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार केल्याने बुधवारी (दि. 3) उरण शहरात ठिकठिकाणी छप्परांवरील पत्रे उडाले, मोठे वृक्ष कोलमडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

उरण शहरातील बोरी गावातील माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड व उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या इमारतीवरील पत्र्याची शेड उडून खाली पडली. उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या घराजवळील असेलेल्या गार्डनमधील मोठे वृक्ष एमएसईबीच्या ओव्हरहेड विजेच्या तारांवर पडले. वीजेचा सप्लाय बंद असल्यामुळे सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. वीजेच्या तारांवर धोकादायक फांद्या एमएसईबीने तोडल्या नसल्याने फांद्या वीजेच्या तारांवर पडल्या. कोणतेही जीवित हानी झाली नाही. उरण नगरपरिषदेची नानासाहेब धर्माधिकारी शाळा क्र.1 व 2 वरील शाळेच्या बाजूस असलेले पत्र्याचे शेड उडाले. उरण चारफाटा येथील मच्छीमार मार्केटचे पत्र्याचे शेड भुईसपाट झाले. जेएनपीटीवसाहतमधील मोठ मोठे वृक्ष कोलमोडले. अशा प्रकारे चक्रीवादळाचा फटका उरण वासियांना मिळाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply