पनवेल : वार्ताहर
नव उद्योजकांना स्वदेशी वस्तू, पदार्थ विक्रीस व्यासपिठ मिळावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आत्मनिर्भर प्रभाग-18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन शहरातील गोखले हॉल येथे दि. 10 ते 11 नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत केली आहे.
याठिकाणी लघु उद्योजक, उद्योजिका, माताभगिनी, युवामित्र यांनी तयार केलेली स्वदेशी वस्तू व दिवाळी फराळ यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करम्यात येणार आहे. सध्या कोरोनामुळे उद्योगधंदे तसेच सामान्य चाकरमान्यांना याची झळ बसल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व व्होकल फॉर लोकल या संकल्पने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून याचा फायदा तसेच सहभागी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.