Breaking News

खांदा कॉलनीतील बंद लाईट सुरू करा! भाजप नगरसेवक आक्रमक; सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी विभागात आसुडगाव सेक्टर 3, 4, 5 सहित खांदा कॉलनीमधील रस्ते व गार्डनच्या लाईट बंद आहे. या संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. 11) बेलापूर येथील रायगड भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजप तर्फे बंद असलेल्या लाईट त्वरित चालू कराव्या अन्यथा आम्ही दिवाळी अगोदर आंदोलन करू, असे ठणकावून सांगितले असता सिडकोचे विभागीय अधिकारी यांनी मागणी त्वरित मान्य करून काम चालू करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता मापारा व कनिष्ट अभियंता कांबळे यांनी दिले. बेलापूर येथील रायगड भवन येथे झालेल्या बैठकीत पनवेल महापालिकेचे नगरसेवक संजय भोपी, एकनाथ गायकवाड, सिता पाटील, भाजप नेते भिमराव पोवार, मोतीराम कोळी, गोपीनाथ मुंढे, रामनाथ पाटील, शांताराम महाडीक, संजय कांबळे, सुहास पाटील, नवनाथ मेंगडे, मंगेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply