उरण : वार्ताहर
उरण शहरातील बोरी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे नंदन पानसरे, सुरेश साळुंखे यांनी दिली. स्पर्धा बोरी गावं मर्यादित असेल. स्पर्धेचे दिनांक रविवारी (दि.15) सायंकाळी 4 वाजता असेल. या स्पर्धांमध्ये किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांनी रायगड किल्याची प्रतिकृती तयार करून सादरीकरण करावी. किल्ले बनविण्यासाठी वापरात येणारे साहित्य हे पर्यावरण पूरक असावे. रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेणार्या स्पर्धकांनी फक्त संस्कार भरती प्रकारची रांगोळी काढावयाची आहे. आणि रांगोळीचा आकार 4 ु 6 फुट असावा. कंदील स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकांनी कंदील हा टाकावूपासून टिकावू वस्तूपासून बनविण्यात यावे. अधिक माहितीसाठी नादान पानसरे 9869112565, सुरेश साळुंखे 9820716818, अतुल ठाकूर 9930670728, संतोष पवार 9619326944, दत्ता पुरव 9833160412 यांच्याशी संपर्क साधावा.