Breaking News

आंतरराष्ट्रीय वेबिनार उत्साहात

पनवेल : वार्ताहर

भारती विद्यापीठ व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयाच्या मानव संसाधन क्लब आणि एबीएलई, नवी मुंबई ह्यांनी संयुक्तरित्या  कोविड आणि कोविड नंतरच्या मानव संसाधन रणनीती ह्या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. आयोजित वेबिनारची सुरुवात राष्ट्रगीतापासून करण्यात आली. ह्या वेबिनारसाठी रिलैअन्स डिजिटल ह्या कंपनीचे ज्येष्ठ उपाअध्यक्ष अ‍ॅण्ड मानव संसाधन प्रमुख ललित कार हे प्रमुख वक्ते होते. वक्त्यांनी कोविड आणि कोविड नंतरच्या मानव संसाधन रणनीती ह्या विषयावर मार्गदर्शन करून सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध कंपनीतील कर्मचारी मंत्रमुग्ध केले. प्रमुख आयोजक प्रा. कुलदीप भालेराव यांनी डॉ. विलासराव कदम, डॉ. अंजली कळसे आणि नील रमेश ह्यांचे वेबिनारकरीता दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. संयोजक डॉ. मनीषा वाघमोडे आणि प्रा. वीणा कोलते यांनी विविध देशातील (रोमानिया, अल्जेरिया, फिलिपिन्स, मलेशिया, दुबई, श्रीलंका आदी.) आणि भारतातील नोंदणी केलेल्या 1000 सहभागीचे तसेच विद्यार्थी राजेश्वरी पुहान, फातिमा कादरी, उषा महापात्रा ह्यांचे आभार मानले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply