Breaking News

पनवेलमध्ये ‘स्वयंसिद्धा’तर्फे कोविड लसीबाबत जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणे-महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा-रायगडच्या वतीने रायगड जिल्ह्यातील या कॅम्पेनचे समन्वयक महादेव जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत व कोविड लसीकरण जनजागृती महाभियान राबविण्यात आले. पनवेल बसस्थानक, खांदा कॉलनी, मोरे हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, पंचरत्न नाका, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, शिरढोण, पळस्पे, पारपूड, गिरवले या ठिकाणी चित्ररथातून स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांच्या वतीने कोविड लसीकरण जनजागृती करण्यात आली. या वेळी मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझर किंवा साबणाने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा. लग्नकार्यात, सभा, पार्ट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा. विनाकारण घराबाहेर अजिबात पडू नका, सध्या कोरोनाची लागण खूप वेगाने होत असून आपण आपल्यामुळे आपल्या परिवारालादेखील धोक्यात आणू शकतो ही जाणीव मनात सतत ठेवा, आपला मास्क बरोबर नाक व तोंड झाकेल अशाच पद्धतीने लावा, घरी राहा सुरक्षित रहा याविषयी जनजागृती करण्यात आली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply