भाजपचे अन्वर शेख यांचा अनोखा उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार
दिवाळीतील पाडव्यासोबत महत्वाचा सण असलेला भाऊबीज तुर्भे विभागात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माजी परिवहन सभापती व भाजपाचे पदाधिकारी अन्वर शेख यांनी प्रभाग क्र.69 मधील विधवा महिलांसोबत भाऊबीज साजरी केली. प्रत्येक महिलेला ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली. या भाऊबीजेच्या भेटीने महिलांना गहिवरून आले.
भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र अनेक घटनेत विधवा महिलांना आर्थिक परिस्थितीने सण साजरे करता येत नाहीत. ही बाब लक्षात घेत भाजपचे अन्वर शेख व त्यांच्या पत्नी झीनत शेख यांनी विधवा महिला भगिनींसाठी हा उपक्रम राबविला. यात 160 पेक्षा जास्त महिलांना साड्या वाटण्यात आल्या. भारतीय संस्कृती, सण समारंभ आपल्याला महिला भगिनींच रक्षण करण्याची, महिलांना आदर-सन्मान देण्याची शिकवण देतात आणि जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासताना महिलांना सर्वोतोपरी मानसन्मान देणे त्यांचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे, अशी भावना शेख यांनी कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेविका कलाबाई पवार, गुलशन धनानी, कौशल्या नंदनवरे, संजय कांबळे, नितीन ढोबळे, चंद्रकांत मंजुळकर, महेश (बाळा) जाधव, आकाश सूर्यवंशी, गौतम जयस्वाल, मो इजहार शेख, श्रीप्रकाश गुप्ता, नितीन बेगडे, सुनील उफ़ाडे, नाना, तम्मा लबडे, राजेश पासवान, रफिक शेख, गुरुदास वाघचौरे, कृष्णप्पा कांबळे, प्रभू यादव, शरीफ खान, नदीम शेख, बबन लबडे, मेराज अन्सारी, कृपाशंकर माळी, नितेश गुप्ता, समीर शेख, अनुज मिश्रा, कय्युम शेख आदी उपस्थित होते.
याचबरोबर भाजपचे अन्वर शेख यांनी प्रभागातील नागरिकांसाठी हेल्थ कार्डचे देखील वाटप केले असून त्यामुळे नागरिकांना रक्त तपासणी करताना सवलत मिळत आहे. याशिवाय येथील नागरिकांना बोरिंगचे पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांना शारीरिक विकार होऊ लागले आहेत. हे शेख यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिकेने पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी आयुक्तांकडे शेख यांनी 13 वेळा पाठपुरावा केला आहे. याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखवत पाण्याची लाईन, शौचालय व नागरिकांसाठी ओपन जिम 15 दिवसांत ही कामे मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन शेख यांना दिले आहे. यासोबत तुर्भे झोपडपट्टी विभागाला भेडसावणारे डम्पिंग ग्राउंड, पालिकेने जमीन विकत घेऊन नवी मुंबई बाहेर हलवावे, अशी मागणी अन्वर शेख यांनी वारंवार आयुक्तांकडे केली आहे.