Breaking News

खोपोली-कर्जत मार्गावर अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

खालापुर : प्रतिनिधी

खोपोली-कर्जत रस्त्यावरील डोळवली व केळवली गावानजीक बुधवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास स्विफ्ट गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक ठेकेदार असलेले तानाजी नामदेव साठे  (रा. कामशेत) बुधवारी रात्री आपल्या स्विफ्ट कारने (एमएच-12,बीडब्ल्यू-6969) कर्जतकडे जात होते. खोपोली-कर्जत मार्गावरील डोळवली, केळवली गावाजवळ त्यांचा ताबा सुटल्याने गाडी दोन – तीन ठिकाणी आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिम व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यामध्ये असलेली कार बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. रात्री खालापूरचे  पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनीही अपघातस्थळाला भेट दिली. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply