Breaking News

खांदा वसाहत परिसरातून तिघांना अग्नीशस्त्रासह अटक

पनवेल : वार्ताहर

खांदा वसाहत परिसरातून तीन व्यक्तींना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्‍या व्यक्तींविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. मिळालेल्या खात्रिशिर बातमीवरून मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखेच्या पथकानेखांदा वसाहत, से.नं.13 रिध्दी कॉम्पलेक्स समोरील रोडवर ता. पनवेल जि.रायगड याठिकाणी सापळा लावुन अभिजीत संभाजी पवार (28, धंदा नोकरी रा. ई-203, ओम शिवा कॉम्पलेक्स, सुकापुर ता.पनवेल जि.रायगड मुळ रा.वरूडेवाफ गाव ता, राजगुरूनगर जि.पुणे) कासिम अब्दुल कलाम (38, धंदा स्वयंपाकी रा.ए-वन बिर्याणी दुकान,3 टाईप,बांठीया शाळेजवळ नविन पनवेल ता.पनवेल जि.रायगड मुळ रा. रा.नरहरगौडा, पो.लखानोवडी, ता.महशी जि.बैरईच राज्य उत्तर प्रदेश) यांना अक्टीव्हा 4 जी (क्र. एमएच 46/बीएफ/6063) या गाडीसह ताब्यात घेतले. या दोन्ही व्यक्तींची अंगझडती घेतली असता अभिजीत पवार याच्याजवळ विनापरवाना बेकायदेशिर देशी बनावटीचे पिस्टल आणि दोनजीवंत काडतुसे मिळुन आले. या व्यक्तीकडे तपास केला असता त्यांनी अग्निशस्त्र हे रोहित मनोहर पवार (25, धंदा नोकरी रा.एच-202 ओम शिवा कॉम्पलेक्स, सुकापुर ता.पनवेल जि.रायगड) यांच्याकडुन घेतल्याचे सांगितल्याने रोहित पवार यास मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखा येथे आणुन नमुद गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने नमुद तीन्ही व्यक्तींविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अटक करण्यात आलेली आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply