Breaking News

पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम स्थळांना सिडको उपाध्यक्षांची भेट

घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याचा मानस

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-43 आणि तळोजा, सेक्टर-21,28,29,31 व 37 या बांधकाम स्थळांना शुक्रवारी (दि. 20) सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी भेट देऊन बांधकाम कार्याचा आढावा घेतला.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरीस देण्याचा मानस असल्याचे व नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहीर करण्याचा सिडकोचा मानस असल्याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थपाकीय संचालक यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबईचे मुख्य अभियंता के. एम. गोडबोले, विशेष प्रकल्प मुख्य अभियंता संजय चोटालिया, सिडकोचे प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, कंत्राटदार व सल्लागार देखील उपस्थित होते.

सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून या योजनेमुळे नजीकच्या काळात अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे आणि नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार या भेटीदरम्यान, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले. सिडकोने नेहमीच अत्यंत किफायतशीर दरात घरांची विक्री केली आहे. त्यामुळे या महागृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सिडको प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी मोठे योगदान देणार असल्याचे मतही उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी या वेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे या गृहप्रकल्प हे परिवहन केंद्रीत असल्याने नागरिकांचा घर ते कामाचे स्थळ यातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

चार पॅकेजमध्ये गृहनिर्माण योजना

सिडकोतर्फे डिसेंबर, 2018 मध्ये ’परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोड्सह विविध नोड्मधील बस डेपो, ट्रक टर्मिनस, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरिया परिसरामध्ये घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजना ही एकूण चार पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे.  या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply