Breaking News

ज्वेल ऑफ नवी मुंबईत स्वच्छता मोहीम

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, इनव्हरमेंट लाइफ संस्था, रॉबिन हूड आर्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात रविवारी (दि. 22) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

या वेळी अनेक गोण्या कचरा गोळा करण्यात आला. ज्वेल ऑफ नवी मुंबई हे शहरातील सर्वांत प्रसिद्ध उद्यान असल्याने त्या ठिकाणी अनेक नागरिक येतात. पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात यंदा देशात अव्वल क्रमांक प्राप्त करण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या 2.7 किमी पसरलेल्या पट्ट्यात ही मोहीम राबविण्यात आली. येथे नागरिकांची थेट स्वच्छतेच्या कृतीतून जनजागृती करण्यात आली. पालिकेकडून होत असलेले हे कार्य पाहून अनेक नागरिकांनीदेखील स्वतःहून या मोहिमेत सहभाग नोंदविला. येत्या स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये नवी मुंबईचा प्रथम क्रमांक येण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त  डॉ. बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  शशिकांत तांडेल, शहराचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक, संस्थांचे सदस्य, नवी मुंबईकर नागरिक, ठेकेदार, साफसफाई कामगार या वेळी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply