Breaking News

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सहाय्यता निधीचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महापौर सहाय्यता निधीतून महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे हस्ते दिव्या हेमंत राणे या दहा वर्षीय मुलीला मदतीचा धनादेश देण्यात आला. पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 8) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीमधून दिव्या हेमंत राणे या दहा वर्षीय मुलीच्या सर्जरीसाठी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्याचा धनादेश देण्यात आला. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर आदी उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply