पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 23) नवे 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 66 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 54 व ग्रामीण 12) तालुक्यातील 66, उरण सहा, खालापूर, माणगाव व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि कर्जत, पेण, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे, तर मयत तीन रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे. नव्या रु ग् ण ा ंम ुळ े जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,256 आणि मृतांची संख्या 1597 झाली आहे. 53,741 जण कोरोनामुक्त झाल्याने 818 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper