पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी लशीबाबत महत्त्वाची माहिती दिली. पंतप्रधानांसोबत कोरोनाविरोधातील लशीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कोरोना लशीच्या तिसर्या ट्रायलवर आमचे लक्ष आहे. कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच होईल. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण माहिती दिली आहे. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतोय. सर्वसामान्यांना परवडेल अशीच लशीची किंमत असेल. जुलै 2021पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार आहोत. ‘सीरम’मध्ये आतापर्यंत चार कोटी डोसची निर्मिती झाली आहे, अशी माहितीही अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …