Breaking News

उरणमध्ये आदिवासींना नवीन रेशनकार्ड वाटप

उरण : वार्ताहर

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी गुरुवारी (दि. 26) चिरनेर येथे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते सर्व आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांना ज्या शासकीय योजना आहेत त्याची योग्यप्रकारे पूर्तता करून ती सर्वांना कशी मिळेल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन अंधारे यांनी दिले.

तहसीलदार आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, कोणतीही योजना मंजूर होण्यास वेळ लागतो. तसेच आदिवासी बांधवांचा कागदपत्रांचा नेहमीच अडचण असल्याने तो विलंब होतो म्हणूनच आधी कागदपत्रांची पूर्तता करूया. प्रथम रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानाची कार्ड काढण्याचे आवाहन केले. नंतर जातीचा दाखला काढून झाल्यावर सर्व योजनांसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यास सक्षम झाल्यावर योजना मंजुर करण्यास वेळ लागणार नाही हे देखील त्यांनी नमुद केले.

नायब तहसिलदार पेडवी यांनी कातकरी समाजातील दुर्बल घटकांसाठी मदत करण्याचे आदेश त्यांच्या विभागातील कर्मचा-यांना दिले होते. त्याप्रमाणे पुरवठा अधिकारी  गोरेगावकर , पुरवठा निरीक्षक बिरासदार, ललीता म्हात्रे व विलास पाटील यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या ह्या मदतीने उरण तालुक्यात आदिवासी समाजासाठी न भुतो न भविष्यती असे रेशनकार्ड वाटपाचा अतिशय उच्च दर्जाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, गोपाळ पाटील, महावितरणचे अभियंता शकील खाटीक, पुरवठा अधिक्षक बिरासदार, रायगड भुषण दत्ता गोंधळी, कातकरी प्रतिनिधी सत्यवान कातकरी, बेबीबाई कातकरी, लक्ष्मी कातकरी हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात महावितरणचे अभियंता शकील खाटीक यांनी सरकारी योजना वाडीवर राबविण्यास सर्वतोपरी सहकार्य कातकरी बांधवांनी करण्याचे आवाहन केले व केळ्याचा माळ ह्या वाडीवर लवकरच एक ट्रान्सफॉर्मर बसविणार असल्याचे मान्य केले.

आदिवासी वाडीवरील प्रश्न जाणुन घेवुन त्याचे निराकरण करण्यासाठी नामदेव ठाकूर कंठवली आणि प्रा. राजेंद्र मढवी यांनी जमीनी स्तरावर जाऊन काम पहात आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply