Breaking News

खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार; आरोपी फरार

खालापूर : खालापूर तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीत राहणार्‍या एका 13 वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खालापूर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांची पथके या नराधमाचा शोध घेत आहेत.
कुंभिवली आदिवासी वाडीतील अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी पाताळगंगा नदीजवळ रोजी रुबी कंपनीच्या बाजूने जात होती. या वेळी मोटरसायकलीवरून आलेल्या एका नराधमाने सावरोली-खारपाडा मार्गाच्या बाजूला असणार्‍या झाडाझुडपे व गवताचा आधार घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply