Breaking News

अजिंक्य रहाणेवर टीका करणार्‍यांना पत्नीचे प्रत्युत्तर

मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीही त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, त्याची पत्नी राधिका धोपावकरने अजिंक्यसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या प्रवासासोबत टीकाकारांना चोख उत्तरही दिले आहे.
राधिकाने पोस्टमध्ये म्हटले, 10 वर्षे! ही वर्षे कशी गेली, मला माहीत नाही. पहाटे 5 वाजता तू मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये लटकून केलेला प्रवास, देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षांची मेहनत आणि नंतर पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा; ही प्रतीक्षा फळाला आली आहे, अजिंक्य! तू अनेक चढ-उतारातून गेला आहेस. सर्व अडचणींशी लढत राहण्याचे धैर्य पहिल्यासारखेच आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात तू आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे काम केले आहे. तुझ्यासोबत नेहमी राहून मला खूप आनंद होत आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply