Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाणजे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर – पाणजे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच करिष्मा भोईर यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी बंदराकडे सातत्याने पाठपुरावा केला. जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडातून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यातील मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शन या कंपनीला जलवाहिनीच्या कामाचा ठेका दिला असून या जलवाहिनीच्या कामाचा व इतर विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पाणजे येथे सोमवारी (दि. 30) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर  अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, चाणजे माजी सरपंच जितेंद्र घरत, रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस शेखर तांडेल, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, सुरज ठवले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार माजी सरपंच मच्छिंद्र पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पाणजे सरपंच करिष्मा भोईर, उपसरपंच नम्रता पाटील, सदस्य विलास भोईर, प्रभाकर पाटील, आशा भोईर, अंजली पाटील, ललिता पाटील, पाणजेचे युवा कार्यकर्ता हरेश भोईर, पाणजे माजी अध्यक्ष मोहन भोईर, कमलाकर भोईर, काशिनाथ भोईर, जयेंद्र पाटील, दिलीप भोईर, लखपती भोईर, करण पाटील, निखिल पाटील, दर्शन घरत, विश्वनाथ पाटील, मच्छिंद्र भोईर, रवींद्र पाटील, मोहित भोईर, संजय पाटील, पाणजे गावचे अध्यक्ष हेमंत पाटील, मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास नाईक आदी उपस्थित होते.

समाजाच्या उत्कर्षासाठी झटणार्‍या पाणजे गावच्या सरपंच करिष्मा हरेश भोईर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने कार्यरत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मंत्री आदिती तटकरे यांनीही केली पाहणी उलवे नोड : रामप्रहर वृत्तमातृभाषेत शिक्षण घेतल्यावरही आपली चांगली …

Leave a Reply