वाराणसी : कृषी सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत, मात्र काही जण शेतकर्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. ज्यांनी शेतकर्यांचा छळ केला, तेच आता शेतकर्यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 30) येथे अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, सरकारे कायदे तयार करतात. काही प्रश्न स्वाभाविक आहेत. तो लोकशाहीचा भाग आहे, पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा. आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी भीती निर्माण केली जाते, परंतु सरकारने केलेल्या कृषी सुधारणा ऐतिहासिक असून, शेतकर्यांना फसवणुकीपासून कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.
Check Also
नमो चषक अंतर्गत कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा : नाव नोंदणीची 5 फेब्रुवारी अंतिम तारीख
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …