पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, सोमवारी (दि. 30) नव्या 74 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 67 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 49 व ग्रामीण 3) तालुक्यातील 52, अलिबाग सहा, उरण पाच, पेण तीन, खालापूर, माणगाव व रोहा प्रत्येकी दोन आणि कर्जत व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी सलग दुसर्या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,031 आणि मृतांची संख्या 1603 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54,371 जण कोरोनामुक्त झाले असून, 1057 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …