Friday , September 29 2023
Breaking News

कर्जत तालुका कुस्तीसाठी पोषक -संदीप वांजळे

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कुस्तीच्या परंपरेला काही दशकांचा इतिहास आहे आणि कुस्तीसाठी येथे पोषक वातावरणही आहे, त्यामुळे कर्जत तालुक्यातील मल्ल राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास राष्ट्रीय कुस्तीपटू संदीप वांजळे यांनी येथे व्यक्त केला. कर्जत तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भगवान धुळे यांनी आर्थिक भार उचलून खरेदी केलेल्या मॅटचे लोकार्पण नुकताच अशोक भोपतराव यांच्या हस्ते करण्यात आले. कडाव येथील ग्रामसचिवालयाच्या वरच्या मजल्यावर झालेल्या या कार्यक्रमात वांजळे बोलत होते. पोषक वातावरण आणि मॅटसारख्या सोयी उपलब्ध झाल्याने येथील मल्लांनी आता राष्ट्रीय पातळीवरील आखाडे गाजवावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुभाष घासे, अशोक भोपतराव, क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे यांची या वेळी समयोचीत भाषणे झाली. ज्येष्ठ संघटक राजाराम कुंभार, पंच सुनील नांदे, माजी सरपंच फुलाजी पवार, कुस्तीगीर संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रय पालांडे, मल्ल हरिचंद्र धुळे, दामू कासार, मारुती ठाकरे, हरिचंद्र कांबेरे, अनंत वाईकर, हरिचंद्र महाराज धुळे, उत्तम धुळे, दीपक भुसारी, महेंद्र चंदन, विजय कोंडीलकर यांच्यासह तालुक्यातील महिला व पुरुष कुस्तीपटू या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply