Friday , September 22 2023

महडच्या मंदिरात ‘रंगछंद’ची रांगोळी

खोपोली : प्रतिनिधी

संकष्टी चतुर्थी निमित्ताने गुरुवारी (दि. 3) खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील भक्तांनी महड येथील विनायकाचे दर्शन घेतले. कोरोनामुळे गेले काही महिने मंदिरे बंद होती. मंदिर उघडण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक भक्तांनी गुरुवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेतले. तर पनवेलच्या ‘रंगछंद‘च्या कलाकारांनी आज गणपती बाप्पांची सुंदर रांगोळी साकारली होती. तसेच गेले अनेक महिने कोरोना योद्धा म्हणून काम करीत असलेले पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांची रेखाचित्रे काढली. पनवेलच्या रंगछंद या संस्थेचे कलाकार रोशन पाटील, अजय मोकल, गितेश पाटील, रोहित भोईर, शुभम कुमरे, अमोल खानावकर, सुशील बुटाला, रवींद्र चौधरी, संदेश आमले, तेजस म्हात्रे, प्रशांत पाटील, शैलेश पाटील, राज पाटील, मयूर म्हात्रे, राजेंद्र पाटील यांनी 20 किलो रांगोळी, विविध प्रकारचे रंग वापरून आणि 10 तासांपेक्षा जास्त वेळ देऊन ही रेखाचित्रे काढली होती.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply