Breaking News

तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला आग

अग्निशमन जवानाचा गुदमरून मृत्यू

पनवेल ः वार्ताहर – तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव आहे.

औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणार्‍या कारखान्याला रात्री 12च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मृत झालेला अग्निशमन दलाचा जवान अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत असल्याची माहिती मिळत असून, जखमी जवानांना नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झाल्याचे समजते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचादेखील समावेश आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply